जलसंपदामंत्र्यांच्या निर्देशानंतर दुपारी आढळा डाव्या कालव्याला सुटले पाणी

आ.अमोल खताळ यांच्या पत्रानंतर जलसंपदामंत्र्यांनी दिले जलयात्रेतूंच निर्देश
संगमनेर प्रतिनिधी
आढळा लाभ क्षेत्रात संगमनेर तालुक्यातील येणाऱ्या गावांमध्ये शेत पिकाला पाणी देण्यासाठी पाणी नसल्यामुळे शेतपिके करपण्याच्या मार्गावर आले याबाबत चिकणी येथील ग्रामस्थांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे मागणी केली होती त्यांच्या मागणीची आश्वी भागामध्ये असणाऱ्या जलयात्रेतूनच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देत आढाळा डाव्या कालव्याला पाणी सुटले त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
संगमनेर तालुक्यातील आढळा लाभ क्षेत्रातील अनेक गावांमध्ये सध्या तीव्र उन्हामुळे पिकांची अवस्था बिकट झाली आहे. पाण्याअभावी पिकांची वाळून चालली आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. विशेषतः चिकणी आणि वडगाव लांडगा परिसरातील शेतकरी वर्गाने पिके वाचवण्यासाठी तातडीने कालव्याला पाणी सोडण्याची मागणी
आढळा डाव्या कालव्याला आज रविवारी दुपारी चार वाजता पाणी सोडण्यात यावे अशी मागणी चिकणी व वडगाव लांडगा येथील ग्रामस्थांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती.
दरम्यान, “गोदा ते नर्मदा” जलयात्रा आश्वी परिसरात असताना आमदार अमोल खताळ यांनी ही बाब जल संपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत मंत्री विखे पाटील यांनी तत्काळ आढाळा डाव्या कालव्याला पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर जलसंपदा विभागाने त्वरित कार्यवाही करत आढळा धरणाच्या डाव्या कालव्याला पाणी सोडले.

कालव्याला पाणी मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पिकांना जीवदान मिळणार असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांना विशेष धन्यवाद दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!