राजधर सदाशिव गोडगे यांना ‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने सन्मानित

संगमनेर (प्रतिनिधी) – साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमानिमित्त बहुजन ग्रामविकास सेवा संघाच्या वतीने आयोजित “आदर्श माता-पिता सन्मान सोहळा २०२६” उत्साहात पार पडला. आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांना उत्तम संस्कार घडवत नोकरी व व्यवसायाच्या क्षेत्रात सक्षम उभे करणाऱ्या प्रेरणादायी पालकांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.


या सोहळ्यात राजधर गोडगे यांना ‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या कर्तृत्ववान पालकांचा गौरव केला.

यावेळी स्वप्नील गोडगे मनोगत व्यक्त करताना म्हणाले,
“आमच्या वडिलांनी आम्हाला प्रामाणिकपणा, कष्ट आणि समाजसेवेचे संस्कार दिले आज वडिलांचा झालेला सन्मान हा आमच्यासाठी सर्वात मोठा अभिमानाचा क्षण आहे.”
कार्यक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचला असून, पालकांच्या त्याग व संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!