नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी तात्काळ प्राधान्य द्या – डॉ. जयश्रीताई थोरात
मेडिकल इमर्जन्सी बाबत युवकांना प्रशिक्षण
संगमनेर ( प्रतिनिधी) सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये अनेक नागरिकांना आरोग्याची अचानक आपत्कालीन समस्या निर्माण होतात. आशावेळी त्या व्यक्ती व कुटुंबातील इतर नागरिक घाबरून जातात. अशा परिस्थितीमध्ये आपत्कालीन वैद्यकीय उपाययोजनाबाबत युवकांनी तात्काळ मदतीसाठी सदैव तयार असावे असे आवाहन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले असून याबाबत संगमनेर तालुक्यातील युवकांना तातडीने करावयाच्या आपत्कालीन वैद्यकीय उपायोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.
एसएमबीटी दंत महाविद्यालय येथे संगमनेर तालुक्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या यावेळी समवेत डॉ. रुचिरा खानसे, डॉ कल्पेश पारख, डॉ. मीरा डॉ. पद्मनाभन, अविनाश आव्हाड, सोमनाथ गुंजाळ, सुविधा अरासिद्ध यांच्यासह युवा काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये हार्ट अटॅक, सर्पदंश, फिट येणे, चक्कर येणे, एक्सीडेंट, विष प्रयोग, उष्माघात याबाबत करावयाच्या प्राथमिक उपाययोजनांबाबत सर्व युवकांना प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, समाजामध्ये सध्या धावपळीमध्ये प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यातून हार्ट अटॅक सारखे प्रसंग उद्भवतात आपल्या परिसरात किंवा कुटुंबात जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला, गावामध्ये कुणाला सर्पदंश झाला, फिट येणे,चक्कर येणे, किंवा वाढत्या वाहतुकीमुळे एक्सीडेंट होणे अशा वेळी युवकांनी प्रशिक्षण घेतले असल्याने त्यांना त्या व्यक्तीला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्या अगोदर प्राथमिक आपत्कालीन उपाययोजना करून सदर व्यक्तीचा जीव वाचवता येतो. हे आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक युवकाने इतरांच्या तात्काळ मदतीसाठी तयार राहावे असे आवाहन केले.
तर डॉ.रुचिरा खाणसे म्हणाल्या की, हार्ट अटॅक आल्यानंतर सर्वप्रथम त्या व्यक्तीचा श्वास चालू राहण्यासाठी आपण पूर्ण दाबाने छाती दाबली पाहिजे. वैद्यकीय मदत पोहोचण्यापूर्वी आपल्याला त्याचा जीव वाचवणे गरजेचे आहे याकरता छाती पंपिंग करणे आवश्यक असते. तर फिट येणे किंवा विष प्रयोग झाला असल्यास त्या व्यक्तीला पाणी देऊ नये.
तर डॉ,कल्पेश पारक म्हणाले की, पॅरलेसिस, अटॅक यासारख्या घटनांमध्ये प्रत्येक घटनेनंतर एक गोल्डन टाईम असतो तो साधण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावा त्यातून कोणाचा तरी जीव वाचणार आहे. हे प्रशिक्षण नक्कीच सर्वांच्या भावी आयुष्यासाठी उपयोगी ठरणार आहे. या प्रथमोपचारातून कोणाचातरी जीव वाचणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी हार्ट अटॅक, एक्सीडेंट, उष्माघात, भाजने, फिट येणे अशा विविध आजारांबाबत करावयाच्या तात्काळ उपायोजनांबाबत सर्वांना प्रशिक्ष


