काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या 1980 च्या फोटोची सोशल मीडियावर धूम
ट्रेंडमध्ये आम्ही 1980 चे ओरिजनलला युवकांची मोठी पसंती
संगमनेर (प्रतिनिधी)–सध्या सोशल मीडियावर 1980 च्या दशकातील फोटोंच्या ट्रेंडचा धमाल पाहायला मिळत आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आपला 1980 मधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून आम्ही 1980 चे ओरिजनल म्हटले आहे .या फोटोला राज्यभरातील तरुणांची मोठी पसंती मिळाली असून अनेकांच्या मोबाईलवर या छबी झळकत आहेत.

सध्या देशात आणि जगभरात सोशल मीडियाचा जमाना आहे. झेन झी ने संपूर्ण वातावरण बदलून टाकले असून मागील दोन-तीन दिवसापासून सोशल मीडियावर 1980 दशकातील फोटोंचा ट्रेंड सुरू झाला आहे .यामध्ये अनेकांनी आपले फोटो जुन्या स्टाईल मध्ये बनवले आहेत.
राज्याचे माजी महसूल व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात हे तरुणांमध्ये आणि राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठे लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोर्स आहेत. टेक्नोसेव्हि असलेल्या असलेल्या माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले 1980 मधील दाढीवर असलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याचबरोबर आम्ही 1980 चे ओरिजनल असे त्यांनी म्हटले आहे. या फोटोला राज्यभरातून मोठी पसंती मिळाली आहे.

सध्या तरुणांमध्ये दाढीची मोठी क्रेझ आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांची 1980 मध्ये दाढीवरील फोटो हे अत्यंत लोकप्रिय होते ते पुन्हा नव्याने सर्वांना पाहायला मिळाल्याने सर्वांमध्ये एक मोठी उत्सुकता आहे.
1985 मध्ये संगमनेर विधानसभेचे सर्वात तरुण आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले याचबरोबर सलग आठ वेळा मोठ्या विक्रमी मताधिक्याने ते विजयी झाले याचबरोबर राज्यात प्रांताध्यक्ष, महसूल ,कृषी ,शालेय शिक्षण, रोजगार हमी ,पाटबंधारे असे महत्त्वाचे खाते त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळले. त्यांच्या कृषिमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये एक लाख शेततळ्यांची निर्मिती सर्वाधिक कृषी उत्पन्न हे वैशिष्ट्य राहिले तर शिक्षण मंत्री पदाच्या काळामध्ये बेस्ट ऑफ फाईव्ह आणि महसूल मंत्री म्हणून ऑनलाईन योजना त्यांनी राबवल्या. या योजना सर्व तरुणांमध्ये लोकप्रिय होत्या.

साहित्य समाजकारण सहकार शिक्षण सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी संगमनेर तालुका आपल्या योगदानातून अग्रगण्य बनवला असून राज्यभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठा आदर आहे.
१९८० च्या दशकातील दाढीवर असलेले विविध फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने तरुणांनी या फोटोंना मोठी पसंती दिली आहे. आम्ही 1980 ची ओरिजनल ही टॅगलाईन सर्वत्र मोठी लोकप्रिय झाली आहे.
राज्यभरातील तरुणांच्या मोबाईल मध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांची छबी
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची युवकांमध्ये मोठी क्रेज आहे त्यांचे 1980 मधील दाढीचे फोटो हे तालुक्यातील राज्यातील व जिल्ह्यातील युवकांच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून या फोटोंची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे.
