माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन
माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी जगन्नाथ पुरी व कृषी संस्कृतीचे दर्शन
कर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषणाबरोबर सामान्यांना त्रास–आमदार तांबे
पृथ्वीवरील सर्व विघ्न दूर कर–डॉ. जयश्रीताई थोरात यांची प्रार्थना
संगमनेर (प्रतिनिधी)–गणेश उत्सव हा सर्वांना आनंद देणारा काळ आहे या काळामध्ये कर्कश आवाजाने सर्वसामान्य त्रास होतो म्हणून गणेश उत्सव हा आनंद देणाऱ्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले असून पृथ्वीवर अनेक संकटे येत आहेत या सर्व संकटांमधून मानवता व पृथ्वीवरील सर्व विघ्न दूर कर अशी प्रार्थना डॉ. जयश्रीताई थोरात यांनी गणरायाच्या चरणी केली आहे.
मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी जगन्नाथपुरी येथील रथाच्या व कृषी संस्कृती असलेल्या आरसात गणेशाची स्थापना झाली तर आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रभा निवासस्थानी गणरायाची स्थापना झाली. यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई थोरात, डॉ जयश्रीताई थोरात, आर्किटेक राजवर्धन थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, सौ दुर्गाताई तांबे, टाटा कॅन्सल विभागाचे विभाग प्रमुख डॉ.प्रा.हसमुख जैन, डॉ हर्षल तांबे, डॉ सौ. वर्षा तांबे, अमृतवाहिनी चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले की गणेशोत्सव काळ हा सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा असतो मागील पंधरा दिवसापासून संगमनेर नगर परिषदेच्या वतीने शहरात गणपती व नवरात्र उत्सवाची तयारी करण्यात आली आहे सर्व सार्वजनिक मंडळांनी या कामात सहकार्य द्यावे डीजेला व्यक्तिशः विरोध असून डीजे मुळे कर्कश आवाजात सर्वसामान्यांना, विद्यार्थ्यांना , महिलांना व वृद्ध व्यक्तींना त्रास होतो म्हणून कमी आवाजात हा उत्सव साजरा करण्यास हरकत नाही. शेवटी आनंद हा महत्त्वाचा आहे या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा घ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या असे आवाहनही त्यांनी केले.

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, गणरायाच्या आगमनामुळे सर्वत्र चैतन्य निर्माण होते. हा आनंदाचा व चैतन्याचा काळ आहे या निमित्ताने विघ्नहर्ता गणेशाकडे प्रार्थना आहे की पृथ्वीवर काही संकटे येत आहेत नेपाळ सारखी घटना दुष्काळ यामुळे सजीव सृष्टीला धोका निर्माण झाला आहे म्हणून माती पाणी हवेचे रक्षण करणे प्रत्येकाने गरजेचे असून पृथ्वीवर येणारे सर्व विघ्न दूर कर अशी प्रार्थना त्यांनी केली.
तर राजवर्धन थोरात म्हणाले की, भारतीय संस्कृती आणि परंपरा फार उज्वल आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवात सुदर्शन निवासस्थानी जगन्नाथ पुरी येथील रथाची प्रतिकृती तयार केली आहे त्याचप्रमाणे आपण कृषी संस्कृती जपणारे माणस आहोत म्हणून जगन्नाथ पुरी चा रथ आणि कृषी संस्कृती यांचा मिलाप असलेला आरस तयार केला आहे. भगवान श्रीकृष्ण हे 64 कलांचे देवता होते त्यामध्ये संगीत ,आर्किटेक्चर, नृत्य अशा विविध कलांचा समावेश होता. ही मोठी संस्कृतीची देण भारतीयांना असून सर्वांनी समृद्ध संस्कृती जपत पर्यावरणाचे रक्षण करावे असे आवाहन त्यांनी केले.
तर माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, गणेश उत्सव काळामध्ये सर्व समाज एकत्रित येऊन आनंद साजरा करतात. एकता समता निर्माण करणारा हा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा होत असल्याचे ते म्हणाले तर नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या की या गणेशोत्सवानिमित्ताने सर्वांच्या जीवनामध्ये आनंद व समृद्धी निर्माण होवो.
यावेळी गणेशाची आरती करून पूजा करण्यात आली यावेळी शहरातील व तालुक्यातील युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कारखाना कार्यस्थळ येथे अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशाची स्थापना करण्यात आली तसेच यशोधन जनसंपर्क कार्यालय येथेही मोठ्या आनंदाने आणि उत्साहात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली.
पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करा –माजी मंत्री बाळासाहेब थोरात
गणेश उत्सव हे आनंदाचे पर्व आहे. सर्व समाज एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत असतो. सर्वांनी हा गणेश उत्सव पर्यावरण पूरक साजरा करताना ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी अधिक काम करत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले असून सर्वांना गणेश उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

