पोलीस प्रशासनासोबत शांतिरक्षक कल्याण संस्थेचे सहकार्य

भोसरी PMT चौकात पोलीस मित्रांचा सहभाग

भोसरी | प्रतिनिधी : नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक शिस्त आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी शांतिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र) यांच्या वतीने पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यात आले.

संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. उमेदभाऊ सुथार यांच्या सूचनेनुसार भोसरी येथील PMT चौक, माय वडेवालेजवळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत सामाजिक जबाबदारी पार पाडली.

यावेळी पुणे जिल्हा बालसुरक्षा प्रमुख मा. उषा घुगे आणि संस्थेच्या सभासद मा. जयश्री टकले उपस्थित होत्या.

पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी संस्थेच्या वतीने सातत्याने सहकार्य केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

पोलीस प्रशासनास सहकार्य, नागरिकांची सुरक्षा आणि सामाजिक बांधिलकी या उद्देशाने संस्थेचे कार्य सुरू आहे.

सेवा ही संकल्पना, सुरक्षा हा उद्देश!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!