विकासकामांवर राजकारण करण्या ऐवजी गावाच्या हिताचा विचार करा- डोंगरे
विरोधकांवर संतोष डोंगरे यांनी साधला निशाणा
संगमनेर (प्रतिनिधी):
निमज गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असून, विकासकामांवर राजकारण करण्याऐवजी गावाच्या हिताचा विचार करावा, अशा शब्दात महा युतीचे नेते संतोष डोंगरे यांनी विरोध कांवर निशाणा साधला
विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी विविध विकासकामांचा उल्लेख करत निमज ग्रामस्थांनी विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.पूर्वीच्या काळी विजेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) मिळवण्यासाठी नागरिकांना वर्गणी काढावी लागत होती मात्र तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर खराब झालेले रोहित्र तातडीने उपलब्ध होत असून त्यासाठी कोणालाही एक रुपया ही खर्च करण्याची गरज राहत नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निमज गावाच्या विकासनिधीचा उल्लेख करताना डोंगरे यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांत गावाला केवळ १० ते २० लाख रुपयांचा निधी मिळत होता. मात्र आता अवघ्या दीड वर्षात त्यापेक्षा तिप्पट निधी मंजूर झाला आहे. त्या मुळे गावात विकासकामांना गती मिळाली असून येणाऱ्या काळात आणखी मोठा निधी मंजूर होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी विरोधकांवर टीका केली. पूर्वी २४ तास वीज मिळत असल्याचा दावा केला जातो, मात्र त्या काळातही लोडशेडिंग होत होते.मात्र शासनाच्या विविध योजनांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून गावातील लोक आता सुजाण झाले आहेत. त्यांना वास्तव परिस्थितीची पूर्ण जाणीव आहे, असे ते म्हणाले.
” निमज गावाच्या विकासासाठी राजकारण करा. काय केले आणि पुढे काय करणार आहात, यावर बोला. गावासाठी निधी मिळत असेल तर त्याचा आनंद सर्वांनी साजरा केला पाहिजे. आणखी विकासनिधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र ते न करता केवळ टीका-टिप्पणी करण्यात काही जण धन्यता मानत आहेत, हे दुर्दैवी आहे,” अशी टीका संतोष डोंगरे यांनी विरोधकांवर केली. शेवटी त्यांनी ग्रामस्थांना आवाहन करताना सांगितले की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून अधिका अधिक निधी आणण्याचे प्रयत्न सुरू राहतील. त्यामुळे अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर विश्वास न ठेवता विकासाच्या कामांना साथ द्यावी. असेही डोंगरे यांनी यावेळी सांगितलेThanks & Regards
