राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पारधेवाडी येथे वृक्षारोपण….

प्रतिनिधी जीवन जाधव.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पारधेवाडीत सिंचन तलाव दुरुस्ती कामाचे उद्घाटन, शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण संपन्न.
औसा : माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे पारधेवाडी येथे विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सिंचन तलाव दुरुस्ती कामाचे उद्घाटन, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त पारधेवाडी येथे 1000 फळझाडे लावण्यांचा संकल्प हाती धरून ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपण उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कृषी विभागांतर्गत पारधेवाडी येथील शेतकरी मिनाबाई भरत साखरे यांच्या शेतामध्ये फळबाग लागवड कामाचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर गावातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सिंचन तलाव दुरुस्ती कामाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांनी वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या उपक्रमांमुळे पारधेवाडी गावात विकास, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला असून ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!