विरोधकांनी खोटे श्रेय घेऊ नये; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ स्टंटबाजी – राजेंद्र सोनवणे

युरिया बफर स्टॉक आमदार खताळांच्या पाठपुराव्यानेच खुला

संगमनेर | प्रतिनिधी
युरियाचा बफर स्टॉक खुला करण्या च्या संदर्भात आमदार अमोल खताळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या त्यानुसारच युरियाचा बफर स्टॉक खुला करण्यात आला आहे त्यामुळे हा बफर स्टॉक खुला करण्यात आमदार अमोल खताळ सोडून इतर कोणीही विशेष प्रयत्न केले नाहीत त्यामुळे विरोधकांनी विनाकारण खोटे श्रेय घेऊ नये अशी टीका शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी केली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून सोनवणे म्हणाले की,
संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरियाचा पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी आमदार खताळ यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी संपर्क कार्यालयामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत युरियाची टंचाई लक्षात घेऊन बफर स्टॉक तात्काळ खुला करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर कृषी विभागाने तात्काळ युरियाचा बफर स्टॉक खुला केला आहे आमदार खताळ यांच्या सूचनांनंतर कृषी विभागाने त्वरित कार्यवाही करत युरियाचा बफर स्टॉक शेतकऱ्यांसाठी खुला केला. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर युरिया उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, खरीप हंगामातील बाजरी, मका सोयाबीन या पिकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

विरोधकांनी स्टंटबाजी म्हणून केवळ निवेदन देऊन शेतकऱ्यांसमोर आंदोलन केले असल्याचा भासवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु जनता खुळी नाही त्यांना सगळं माहीत आहे काम कोण करते आणि कोण नाही करत त्यामुळे तुम्ही किती ही खोटे आंदोलन करा त्याचा जनतेवर काही परिणाम होणार नाही.या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नासाठी आमदार अमोल खताळ सातत्याने शासन स्तरावर आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून, भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा विश्वासही राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केला

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आ.खताळ यांचा संघर्ष कायम!

आमदार अमोल खताळ हे राज्यातील मोजक्या आमदारांपैकी एक आहेत, ज्यांनी प्रत्येक अधिवेशनात सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवला आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका आहे. त्यामुळेच तालुक्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी आपल्या विविध समस्या आणि अपेक्षा घेऊन विश्वासाने त्यांच्या संपर्क कार्यालयात येत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांचा संघर्ष भविष्यातही असाच सुरू राहील.

– राजेंद्र सोनवणे(तालुकाप्रमुख, शिवसेना)
…………………………………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!