आयुर्वेद सेवा जनतेच्या दारी; गंगागिरी आरोग्यधाम व गोदाधाम आयुर्वेदिक ओपीडीचे २९ जुलै रोजी उद्घाटन
श्रीरामपूर | प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असलेल्या आयुर्वेदाचा प्रसार करून प्रत्येक घरापर्यंत निरोगी जीवनाचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र गोदावरी धाम, बेट सराळा (ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांच्या वतीने गोदाधाम आयुर्वेदिक ओपीडी प्रा. लि., गंगागिरी आरोग्यधाम आयुर्वेदिक उपचार केंद्र व गंगागिरी औषधालय सुरू करण्यात येत आहे.

या तिन्ही आरोग्यसेवांचे उद्घाटन गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर, बुधवार दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार असून, गुरुवर्य महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
संस्थेच्या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रसार, जनजागृती तसेच सेवाभावी रुग्णसेवा अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. निरोगी समाज आणि समृद्ध राष्ट्र घडविण्याच्या ध्येयाने हा उपक्रम सुरू होत असल्याचे संस्थेने सांगितले आहे.
या उद्घाटन सोहळ्यास भाविक, नागरिक आणि आयुर्वेदप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९३७१२३२२३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
