माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते प्रकाशन संपन्न

संगमनेर (प्रतिनिधी) — महाराष्ट्रातील साहित्यिक चळवळीमध्ये मानाचे स्थान निर्माण करणारे संपादक माननीय एकनाथराव ढाकणे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून प्रकाशित होणारे ग्रामसेवा संदेश हे मासिक गेल्या 21 वर्षांपासून ग्रामविकास, अध्यात्म आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देत आहे.

या मुखपत्राचा दीपावली विशेषांक 2025 चे प्रकाशन आज दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी राजे सुदर्शन निवास, संगमनेर येथे माजी मंत्री माननीय बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

प्रकाशन सोहळ्यात संपादक एकनाथराव ढाकणे साहेब यांनी विशेषांकाची माहिती सादर करत संपादकीय मंडळाच्या वतीने माननीय थोरात साहेबांचा सन्मान केला.

माननीय थोरात साहेब म्हणाले की, “ग्रामसेवा संदेशचा दीपावली अंक गेली 21 वर्षे दर्जेदार आणि विचारप्रवर्तक स्वरूपात प्रकाशित होत असून, पुरोगामी विचारांचे हे मासिक साहित्य व ग्रामविकास क्षेत्राला प्रेरणादायी आहे.”

या प्रसंगी ग्रामसेवक पतसंस्थेचे नूतन चेअरमन श्री. सुनील नागरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. थोरात साहेब म्हणाले, “श्री. ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्था आणि संघटना यशस्वीपणे वाटचाल करत आहेत. त्यांनी कर्मचारी चळवळीला दिशा देत हक्क व कर्तव्यांची जाणीव करून दिली आहे. ग्रामपंचायत व संघटनात्मक स्तरावर त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करावे तितके थोडे आहे.”

ग्रामसेवा संदेश गेली 21 वर्षे सातत्याने प्रकाशित होत असून, चालू वर्षाच्या अंकामध्ये नामवंत लेखकांचे दर्जेदार लेख व विशेषांक प्रकाशित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हा अंक संपूर्ण महाराष्ट्रभर विनामूल्य वितरित केला जातो, हे या मासिकाचे खास वैशिष्ट्य आहे.


संपादक एकनाथराव ढाकणे यांनी या प्रसंगी सर्व जाहिरातदार, लेखक, कवी आणि संपादकीय मंडळाचे आभार मानले.


या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये —
प्रा. लोकसेवक बाबा खरात, डॉ. तुकाराम सांगळे (वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य), श्री. सुनील नागरे (चेअरमन, ग्रामसेवक पतसंस्था, अहिल्यानगर), श्री. रमेश बांगर (सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी), श्री. सुरेश मंडलिक (संचालक, पतसंस्था, अहिल्यानगर), डॉ. राजेंद्र फंड (सहसंपादक, ग्रामसेवक संदेश), श्री. नितीन सांगळे (सामाजिक कार्यकर्ते, संगमनेर), कवी सुभाष कर्डक, तसेच श्री. अरविंद गाडेकर (अध्यक्ष, साहित्य परिषद, संगमनेर) बाबासाहेब पाटील पावशे अध्यक्ष सरपंच सेवा संघ आणि साळवे साहेब सेवानिवृत्त कृषी अधिकारी संगमनेर अनिल देशपांडे साहित्य परिषद संगमनेर यांचा सहभाग होता.

संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. राजेंद्र फंड यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!