हभप राहुल महाराज पोकळे ‘समाजरत्न युवा कीर्तिकार’ पुरस्काराने सन्मानित

संगमनेर (प्रतिनिधी) – बहुजन ग्रामीण विकास सेवा असोसिएशनच्या वतीने सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोहारे-मिरपूर (ता. संगमनेर) येथील हभप राहुल महाराज पोकळे यांना ‘समाजरत्न युवा कीर्तिकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कसारे येथे आयोजित साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान सोहळा पार पडला. सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते राहुल महाराज पोकळे यांना सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी बाभळेश्वर येथील गुरुकुलचे नवनाथ महाराज म्हस्के, नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक भागवत आरोटे, सरपंच सेवा महासंघाचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, सरपंच परिषदेचे अरुण दळवी, सरपंच सेवा संघाचे बाबासाहेब पावसे तसेच बहुजन ग्रामीण विकास सेवा असोसिएशनचे अध्यक्ष रामनाथ बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना राहुल महाराज पोकळे म्हणाले की, “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून समाजसेवेची जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी, धार्मिक व सामाजिक ऐक्य दृढ करण्यासाठी आणि युवकांना सकारात्मक दिशादर्शन करण्यासाठी मी पुढील काळातही कटिबद्ध राहणार आहे.”
कार्यक्रमास परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!