एजंटगिरीला काँग्रेस बगलबच्च्यांचेच संरक्षण -थोरात
वाहनचालकांची एजंट गिरीतून मुक्तता करण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांना केल्या सूचना
संगमनेर प्रतिनिधी :
“ संगमनेर तालुक्याच्या विकास कामांची चिंता करण्याची गरज नाही. विकासकामे प्रभावीपणे राबविण्या साठी आमदार अमोल खताळ हे सक्षम आणि भक्कम आहेत. त्यामुळे काहींनी तालुक्याच्या विकासाबाबत खोटा कांगावा करून जनतेची दिशाभूल करू नये,” अशी टीका वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात यांनी काँग्रेसच्या बगलबच्च्यांवर केली.
सरपंच थोरात यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार अमोल खताळ यांनी अल्पावधीतच संगमनेर तालुक्यात पाणीपुरवठा, वीज, रस्ते, रोजगार, शेती आणि पायाभूत सुविधांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर ठोस कामे केली आहेत. त्यामुळे तालुक्याच्या विकासाबाबत कोणालाही शंका घेण्याचे कारण नाही., वडगावपान येथे श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कॅम्पदरम्यान काही एजंटांकडून वाहनचालकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी आमदार अमोल खताळ यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार खताळ यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी संपर्क साधून तात्काळ कारवाईची मागणी केली.
“एजंटगिरीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुम्हीच पाठीशी घालत आहात. तुमच्यामुळेच खऱ्या अर्थाने एजंटगिरीला खतपाणी मिळाले आहे. आता मात्र त्या एजंटगिरीला आळा घालण्यासाठी आणि सर्वसामान्य वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी आम्ही प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या आहेत,” आमदार अमोल खताळ यांना संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने रोग प्रतिनिधी केले आहे त्यामुळे त्यांना कुठलीही स्टंटबाजी करण्याची गरज नाही तसेच फोटोसेशन करण्याची आवश्यकता नाही असा आरोपही सरपंच श्रीनाथ थोरात यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर केला.
आमदार अमोल खताळ यांचे नेतृत्व विकासाभिमुख असून ते प्रत्येक प्रश्नावर तत्परतेने लक्ष देत आहेत. शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळे विकास कामांबाबत निराधार आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जनतेला मान्य होणार नाही. संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आमदार अमोल खताळ यांच्याकडे स्पष्ट दृष्टीकोन आणि सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे विरोधकांनी केवळ राजकीय टीका करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घ्यावी, असा सल्लाही सरपंच श्रीनाथ थोरात यांनी दिला
वडगाव पान येथील ज्या सभागृहात आरटीओ कॅम्प चालतो ते सभागृहा साठी माजी केंद्रीय मंत्री माजी खासदार पद्मभूषण स्व बाळासाहेब विखे पाटील यांच मोलाचे योगदान राहिले आहे याची काँग्रेस वाल्यांना विसर पडला आहे अशी टीका वडगाव पान चे सरपंच श्रीनाथ थोरात यांनी विरोधकांवर केली
सास्कुतीक सभागृहाच्या दुरुस्ती साठी २० लाखाचा निधी दिला-आ खताळ
वडगाव पान येथे दर बुधवारी भरविण्यात येणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कॅम्पसाठी ग्रामपंचायत च्या वतीने बांधण्यात आलेले सभागृह त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे त्यामुळे वाहन परवाना, नोंदणी व इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक आडी अडचणींचा सामना करावा लागत होता. या सभागृहाच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतने मागणी केल्यानुसार आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेत या सभागृहाच्या दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी तब्बल २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात यांनी सांगितले

