आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज संगमनेरात आक्रोश मोर्चा; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे माजी सभापती बाळासाहेब गायकवाड यांचे आवाहन

संगमनेर, प्रतिनिधी : अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात आज (२ जुलै) संगमनेर शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून प्रांत कार्यालयापर्यंत भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी सभापती बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे.

यावेळी बोलताना बाळासाहेब गायकवाड म्हणाले, “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे. आपल्या पुढील पिढ्यांच्या हक्कांसाठी हा संघर्ष असून समाजातील माता-भगिनी, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व आंबेडकरी बांधवांनी या आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे.”

ते पुढे म्हणाले, “आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या संविधानिक हक्कांच्या रक्षणासाठी एकजूट दाखविण्याची ही संधी आहे. त्यामुळे कोणताही समाजबांधव या आंदोलनापासून दूर राहू नये. मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐक्य आणि संविधानाप्रती असलेली आपली बांधिलकी दाखवावी.”

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून प्रांत कार्यालयापर्यंत निघणाऱ्या या आक्रोश मोर्चात हजारो नागरिक सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!