आदर्श शिक्षक सुभाष जोंधळे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळा आज

संगमनेर, प्रतिनिधी : तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथील श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक श्री. सुभाष आंबू जोंधळे यांच्या सेवापूर्तीनिमित्त आज, शनिवार (दि. ११ जुलै) सकाळी ९.३० वाजता विद्यालयाच्या प्रांगणात भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याला पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता तथा तांत्रिक सल्लागार राजेंद्र राहाणे, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास भागवत, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे माजी संचालक कैलास राहाणे, गटशिक्षणाधिकारी गुंड साहेब यांच्यासह शिक्षण, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

श्री. सुभाष जोंधळे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक तसेच कौठेकमळेश्वर परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!