ज्येष्ठ पत्रकार गोरक्ष नाथ नेहे पाटील यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या राज्य संयोजकपदी निवड
परभणी : प्रतिनिधी
मराठवाड्यातील परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या नूतन राज्य कार्यकारिणी पदाधिकारी पदग्रहण सोहळ्यात संगमनेर येथील ज्येष्ठ पत्रकार गोरक्ष नाथ नेहे पाटील यांची संघटनेच्या राज्य संयोजकपदी निवड करण्यात आली. यावेळी त्यांना निवडीचे अधिकृत नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संघटनेच्या नूतन राज्य कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा परभणी येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पत्रकार व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के, प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया, राज्य सरचिटणीस विशाल पाटील, विभागीय प्रदेशाध्यक्ष अजित कुंकलोळ व नरेंद्र देशमुख, संस्थेचे संचालक गोरक्षनाथ मदने आदी मान्यवरांच्या हस्ते गोरक्ष नाथ नेहे पाटील यांना राज्य संयोजकपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे, पत्रकार संघटना अधिक सक्षम करणे, पत्रकारांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे काम करणे तसेच राज्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी राज्य संयोजक म्हणून आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे गोरक्ष नाथ नेहे पाटील यांनी यावेळी सांगितले.
संगमनेर तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या गोरक्ष नाथ नेहे पाटील यांची राज्यस्तरीय जबाबदारीवर निवड झाल्याबद्दल पत्रकार, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा सचिव नवनाथ वावरे भारत रेघाटे इदरीसभाई शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते
पत्रकारांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करणार
“व्हॉईस ऑफ मीडिया’ने माझ्यावर राज्य संयोजकपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. राज्यातील पत्रकारांच्या समस्या, त्यांचे प्रश्न आणि हक्क यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. पत्रकारांची एकजूट अधिक मजबूत करण्यासाठीही प्रयत्नशील राहू,” असे नवनियुक्त राज्य संयोजक गोरक्ष नाथ नेहे पाटील यांनी सांगितले.

