संविधान रक्षणाच्या लढ्यात काँग्रेसचे शिलेदार – बंटी यादव यांच्यावर दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष पदाची धुरा..

अहिल्यानगर -भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सामाजिक न्याय आणि संविधान रक्षणाच्या लढ्याला अधिक बळकटी देत, अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी मा. बंटी यादव यांची दुसऱ्यांदा फेरनिवड केली आहे. पक्षाच्या निष्ठावान, संघर्षशील आणि तळागाळातील कार्यकर्त्याला पुन्हा संधी मिळाल्याने जिल्हाभरातील आंबेडकरी, पुरोगामी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ही निवड अखिल भारतीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री मा. आ.बाळासाहेब थोरात यांच्या कुशल नेतृत्वाखाली, अखिल भारतीय काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्र पाल गौतमजी,माझे मार्गदर्शक तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक, बौद्ध धम्माचे प्रचारक व प्रसारक मा. डॉ. सिद्धार्थ भाऊ हत्तीआंबिरे यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील ख्यातनाम गायक, विचारवंत व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे कर्तव्यदक्ष प्रदेशाध्यक्ष मा. डॉ. अनिरुद्धजी वनकर यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बंटी यादव म्हणाले
“माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाने दुसऱ्यांदा विश्वास दाखवून जी महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली, त्याबद्दल मी सर्व वरिष्ठ नेतृत्वाचा मनःपूर्वक आभारी आहे. आपण दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत, भारतीय संविधानाने दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांची जपणूक करत, काँग्रेस पक्षाचा विचार, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा* आणि नेते राहुलजी गांधी यांच्या भारत जोडोचा संदेश तळागाळातील शोषित, वंचित, उपेक्षित, दलित, आदिवासी व बहुजन समूहापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचे कार्य या पदाच्या माध्यमातून निष्ठेने करेन, हा माझा दृढ संकल्प आहे. संविधान वाचवण्याच्या लढ्यात काँग्रेस पक्ष नेहमीच आघाडीवर राहिला आहे आणि राहील.”

दरम्यान, बंटी यादव यांच्या निवडीबद्दल संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते पँथर माणिकराव यादव, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात,जोर्वे जिल्हा परिषद गटाचे नेते शरद नाना थोरात, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे, संजय भोसले,आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!