अकोले विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा भाजप परिवारात प्रवेश
अकोले प्रतिनिधी
अकोले विधानसभा मतदारसंघातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा सौ. सुनिता अशोकराव भांगरे आणि शेंडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. दिलीपराव भांगरे यांच्यासह तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी नव्या कार्यकर्त्यांचे भाजपा परिवारात स्वागत करण्यात आले.
या प्रवेशामुळे अकोले तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार असून, स्थानिक पातळीवरील विकासकामांना नवे बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास माजी आमदार वैभव पिचड, ज्येष्ठ नेते सिताराम भांगरे, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपला नवसंजीवनी मिळेल, असा राजकीय अंदाज वर्तवला जात आहे.
