“इंदोरीकर महाराजांवर टीका करणाऱ्यांनी त्यांच्या प्रवासाकडे एकदा मागे वळून पाहावं”
संगमनेर (प्रतिनिधी):
इंदोरीकर महाराजांवर त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याचा सोहळा मोठ्या थाटामाटात केल्याबद्दल सोशल मीडियावर टीकेची झोड उठली असली तरी त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिलं, तर आजचा यशस्वी टप्पा त्यांच्या संघर्षाचीच कहाणी सांगतो.
एक काळ होता, जेव्हा इंदोरीकर महाराज गावागावात सायकलवर कीर्तनासाठी जात असत. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधन होत असे, आणि लाखो भक्त त्यांच्या वाणीतून प्रेरित होत.
बाप कंपणीचे अध्यक्ष रावसाहेब घूगे यांनी आठवण सांगताना म्हटलं, “मी इंदोरीकर महाराजांना तेव्हापासून ओळखतो जेव्हा माझी दहावीची परीक्षा होती. आमच्या गावात त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन केलं होतं, आणि ते सायकलवर आले होते.”
आज त्यांनी महाराष्ट्रात स्वतःचा ब्रँड निर्माण केला आहे. कीर्तन सेवेतून समाजाला दिशा देत त्यांनी परिश्रमाने आपले स्थान मिळवलं.
“आपण केलेल्या मेहनतीचा फायदा आपल्या लेकरांना व्हावा, ही प्रत्येक बापाची इच्छा असते. मग इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा मोठा केला तर त्यात गैर काय?” असा प्रश्न अनेक भक्त विचारत आहेत.

समाजप्रबोधन करताना त्यांनी कित्येकांना बदलण्याची प्रेरणा दिली, आणि आज स्वतःच्या कुटुंबासाठी तेच करत आहेत. म्हणूनच — टीका करण्याआधी, त्यांच्या सायकलवरून सुरू झालेल्या प्रवासाची कहाणी आठवायला हवी.आसे मत बाप कंपणीचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब घूगे यांनी सरपंच माझाशी बोलताने मांडले

