संगमनेरकरांच्या हातात शहर विकासाचा आराखडा!
‘आपला जाहीरनामा आपणच बनवायचा’ — सत्यजीत तांबे यांचा अभिनव उपक्रम


संगमनेर (प्रतिनिधी) –
संगमनेरच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी नवा उपक्रम राबवित आमदार सत्यजीत तांबे यांनी एक आगळीवेगळी संकल्पना मांडली आहे — “संगमनेरकरांचा जाहीरनामा”.
या माध्यमातून प्रत्येक संगमनेकराला स्वतःच्या शहराच्या विकास आराखड्यात आपले मत, कल्पना आणि अपेक्षा मांडण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.

तांबे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शहराच्या पुढील ५० वर्षांच्या विकासाचा आराखडा आपणच तयार करावा. त्यासाठी खास QR कोडद्वारे सुचना, कल्पना आणि प्रश्न नोंदविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

“संगमनेरच्या विकास प्रवासाचे साक्षीदार नव्हे, तर शिल्पकार व्हा,” असे आवाहन करत तांबे यांनी नागरिकाभिमुख, सहभागात्मक आणि दूरदर्शी विकासाचा नवा अध्याय सुरू केला आहे.

हा उपक्रम नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण करीत असून, संगमनेरच्या भावी वाटचालीला नवी दिशा देणारा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!