कौठेकमळेश्वर येथे स्व. सविता जोधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा सूत्र हरिकीर्तन संपन्न
संगमनेर तालूक्यातील कौठेकमळेश्वर येथील प्रगतशील शेतकरी सोमनाथ जोधळे यांच्या पत्नी स्व. सविता जोधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्री. ह. भ.भ. प. विश्वनाथगिरीजी महाराज यांच्या हरिकर्तनाचा कार्यक्रम भक्तिमय व श्रद्धापूर्ण वातावरणात संपन्न झाला.

अव्वल कीर्ति विश्वनाथगिरीजी महाराज म्हणाले की, मानवाचे जीवन नश्वर असून प्रत्येकाने सत्कर्म, सदाचार व ईश्वरभक्ताचा मार्ग अवलंबला पाहिजे. संसार करत असताना संयम, प्रेम, सेवा व परोपकाराची भावना जपली तरच जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. तसेच त्यांनी हा अंतिम सत्य असून पुण्यकर्म मार्गाचेच मानवाचे जीवन उज्ज्वल बनते, असे सांगितले.
या हरिकीर्तन कार्यक्रमाला भाविक, ग्रामस्थ व मोठ्या ग्रामने उपस्थित होते. सर्वांनी शांततेत व भक्तिभावाने कीर्तनाचा लाभ घ्यावा.
या चहा ह. भ.भ. प. झुरुळे महाराज तसेच डॉ. गोडगे,उत्तमराव जोधले यांनी स्व. सविता जोधळे यांना श्रद्धांजली अर्पण करत मनोगत व्यक्त केले. त्यांचा सामाजिक, कौटुंबिक व धार्मिक कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सुसंचालन निळडे कालवा कार्यकारिणीचे नेते उत्तमराव जोळे केले तर आभार आप्पासाहेब जोळे यांनी दिले.
कार्यक्रमासाठी महाप्रसादाचे कार्यक्रम करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जोळे कुटुंबीय तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित भाविकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.
