उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय शोकसभा

संगमनेर | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते मा. अजितदादा पवार साहेब यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करण्यासाठी संगमनेर शहरात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता, मालपाणी लॉन्स, शेतकी पेट्रोल पंपासमोर, नाशिक रोड, संगमनेर येथे ही शोकसभा संपन्न होणार आहे.

या शोकसभेसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, अजितदादा पवार यांच्या सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय कार्याला यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.
तरी सर्व नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व मान्यवरांनी उपस्थित राहून मा. अजितदादा पवार साहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!