अजितदादांच्या अंत्यसंस्कारातील गर्दीचा चोरट्यांनी घेतला फायदा; २० लाखांचा ऐवज लंपास, आठ जण अटकेत


बारामती, प्रतिनिधी –
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्यभरातून हजारो चाहत्यांनी बारामतीत गर्दी केली होती. मात्र या भावनिक क्षणी काही समाजकंटकांनी गर्दीचा गैरफायदा घेत मोठी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी सुमारे २० लाख रुपये किमतीच्या सोनसाखळ्या तसेच रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे.


या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तत्काळ तपास सुरू करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या चोरीप्रकरणी अहिल्यानगरसह राज्याच्या विविध भागांतील एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अंत्यसंस्कारावेळी प्रचंड गर्दी, गोंधळ आणि भावनिक वातावरणाचा फायदा घेत चोरट्यांनी नागरिकांना लक्ष्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.


या घटनेमुळे अंत्यसंस्कारास आलेल्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, अशा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अधिक कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून चोरीस गेलेला ऐवज जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!