देवस्थानांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार खताळ


महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यातील देवस्थानांना भेटी


संगमनेर/ प्रतिनिधी
“भरपूर पाऊस पडू द्या, बळीराजा सुखी होऊ द्या. लहानांपासून ज्येष्ठां पर्यंत सर्वांना उत्तम आरोग्य लाभू द्या आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ द्याअशी प्रार्थना निझर्णेश्वर, रामेश्वर, खांडेश्वर, कपाारेश्वर आणि बाळेश्वर या महादेव देवस्थानांच्या चरणी करून देवस्थानांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला

 


संगमनेर तालुक्यातील रामेश्वर, कोकणगाव, निझर्णेश्वर, खांडगाव खांडेश्वर तसेच कपारेश्वर येथे आमदार खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते अभिषेक, महा पूजा, महाआरती करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी निझर्णेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बबन पवार, उपाध्यक्ष दिलीप पवार, बाळासाहेब जोंधळे गंगाधर वायकर, हौशीराम जोंधळे, वडगावपान सरपंच श्रीनाथ थोरात, सुमित काशिद, शरद येलमामे, खांडगाव कपारे श्वर देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष सोमनाथ गुंजाळ सचिव रामनाथ गुंजाळ, बादशाह गुंजाळ, सुनील रुपवते, विकास अरगडे, रोहिदास गुंजाळ रामेश्वर देवस्थानचे डॉ. महेंद्र कोल्हे, अविनाश वलवे, अविनाश वाकचौरे, कमलेश डेरे, हरीश वलवे, शरद कवडे, गोकुळ देशमुख, यांच्यासह आदी शिवभक्त उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, आत्तापर्यंत जो निधी मला मिळालेला आहे त्या निधीतील निम्म्याहूनअधिक निधी देवस्थानांच्या विकासासाठी दिला आहे. मी धार्मिक परिवारातून आलेलो असून प्रत्येक देवस्थानाबद्दल माझ्या मनात श्रद्धा आहे. देवस्थान परिसराचा विकास करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही परंतु ज्या महायुती सरकारने या देवस्थानांच्या विकासासाठी निधी दिला आहे त्या महायुती सरकारच्या पाठीमागे आपण भक्कम उभे रहा धर्म टिकला तर देश टिकेल. आपल्या हिंदू धर्माच्या जतनासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेषतः लहान व तरुण पिढीला आपल्या देव-धर्मा बाबत योग्य माहिती देऊनजनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले

संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील कपारेश्वर हे देवस्थान सर्वप्रथम क वर्ग दर्जामध्ये घेणे आवश्यक आहे देवस्थान ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी क वर्ग दर्जाचा प्रस्ताव तयार करून माझ्याकडे लवकरात लवकर द्यावा तो जिल्हा नियोजनच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढे ठेवून त्यांच्याच माध्यमातून देवस्थानला क वर्ग दर्जा मिळून दिला जाईल त्यानंतर या मंदिर परिसराचा विकास होण्यास मदत होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!