एकविरा महिला क्रिकेट चषक जिजाऊ ब्रिगेडने पटकावला

रस्सीखेचमध्ये सावित्रीच्या लेकी प्रथम


5260 महिलांच्या सहभागातील क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न


संगमनेर (प्रतिनिधी)–महिलांच्या आरोग्याबरोबरच कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी डॉ जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून झालेल्या एकविरा क्रीडा महोत्सव 2026 मध्ये 5260 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून क्रिकेट मधील अंतिम सामन्यात जिजाऊ ब्रिगेड संगमनेरने हिरकणी वडगाव पान संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले तर रस्सीखेच मध्ये सावित्रीच्या लेकी संघाने विजेतेपद पटकावले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एकविरा फाउंडेशन च्या वतीने क्रिकेट रस्सीखेच व बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत क्रिकेटमध्ये 160 रस्सीखेच मध्ये 252 तर बॅडमिंटन मध्ये 327 संघांनी सहभाग घेतला.
सात दिवस सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवात तालुक्यातील 5260 महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या स्पर्धेचा पारितोषण वितरण समारंभ अत्यंत दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. याप्रसंगी डॉ. जयश्रीताई थोरात, पांडुरंग पा. घुले, सौ. रचनाताई मालपाणी, ॲड नानासाहेब शिंदे, रामहरी कातोरे ,नवनाथ आरगडे अंकुश ताजने, डॉ हर्षवर्धन गुंजाळ, अभयसिंह जोंधळे ,ओम मयूर, नगरसेविका डॉ अनुराधा सातपुते, सरोजना पगडाल, अर्चना दिघे, गणेश गुंजाळ, यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या महिला क्रिकेट स्पर्धेत खुल्या गटातून संगमनेर येथील जिजाऊ ब्रिगेडने अंतिम सामन्यात हिरकणी वडगाव पान संघावर 14 धावांनी मात केली व 11 हजार रुपये आणि मानाचा चषक पटकावला, द्वितीय संघाला 7000 रुपये व ट्रॉफी तर वीरांगाना पिंपळगाव माथा या संघाला तृतीय क्रमांक 5000 रुपये बक्षीस आणि ट्रॉफी देण्यात आली. महाविद्यालयीन गटामधून सह्याद्री जुनियर कॉलेजने प्रथम क्रमांक मिळवला तर अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजला द्वितीय क्रमांक मिळाला. आणि सह्याद्री सीनियर कॉलेजला तृतीय क्रमांक मिळाला.

तर शालेय गटामधून श्री श्री रविशंकर विद्यामंदिराने सलग चौथ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला. तर सह्याद्री विद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला. चंदनेश्वर विद्यालय चंदनपुरीला तृतीय क्रमांक मिळाला.

रस्सीखेच मध्ये महिला खुल्या गटातून सावित्रीच्या लेकी संगमनेर यांनी प्रथम क्रमांक, वडगाव पाण हिरकणी द्वितीय क्रमांक व घे भरारी घुलेवाडी तृतीय क्रमांक मिळवला. महाविद्यालयीन गटामधून अमृतेश्वर माध्यमिक विद्यालय संगमनेर खुर्दने प्रथम क्रमांक मिळवला, सह्याद्री जुनियर कॉलेजने द्वितीय क्रमांक व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात थोरात वरिष्ठ महाविद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला. शालेय गटामधून चंदनेश्वर विद्यालय चंदनापुरी यांनी प्रथम क्रमांक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्या भवन यांनी द्वितीय क्रमांक व शुक्लेश्वर विद्यालय सुकेवाडी यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

प्रथम विजेत्यांना 11000 रुपये रोख व ट्रॉफी द्वितीय क्रमांक विजेत्यांना 7000 रुपये रोख व ट्रॉफी व तृतीय क्रमांक विजेत्यांना पाच हजार रुपये रोख व ट्रॉफी बक्षीस देण्यात आली याचबरोबर व्यक्तिगत बक्षीसही अनेक महिलांना देण्यात आली.

यावेळी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाले की, महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एक वेळा फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी आरोग्य ,शिक्षण, संतुलित आहार, व्यायाम याबाबत विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या क्रीडा महोत्सवातून तालुक्यातील प्रत्येक गावांमधून महिला मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. सात दिवसांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण होते. एकमेकींच्या भेटी होणे. मैत्री वाढणे याचबरोबर आरोग्य आणि आहाराबाबत चर्चा होणे ही आनंदाची बाब आहे. या क्रीडा महोत्सवात अगदी 7 वर्षाच्या मुलीपासून 72 वर्षाच्या आजी पर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. अत्यंत आनंदाने आणि खेळीमेळीने झालेल्या या स्पर्धा नक्कीच ऊर्जा देणाऱ्या आहेत.

याचबरोबर ताण-तणाव धावपळीचे जीवन असंतुलित आहार यामुळे कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनक असून 30 वर्षा पुढील सर्व महिलांनी गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी करून घ्यावी. पहिल्या व दुसऱ्या स्टेज मधील कॅन्सर आढळल्यास तो पूर्णपणे बरा करता येतो. कॅन्सरवर आपण मात करू शकतो त्याला घाबरण्याची कारण नाही असे सांगताना स्वस्त रहा मस्त रहा जबरदस्त रहा हा आरोग्यदायी सल्ला त्यांनी दिला.

यावेळी सर्व खेळांमधील खेळाडू महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आंतरराष्ट्रीय पारितोषिक वितरणाच्या धरतीवर, फटाक्यांची आतिषबाजी ,जल्लोष, डीजे आणि विद्युत रोषणाईत झालेला हा सोहळा सर्वांसाठी संस्मरणीय होता. या कार्यक्रमाचे आयोजनासाठी एकविरा फाउंडेशनच्या सर्व महिला व युवती कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

पारितोषिक वितरण कार्यक्रमात महिलांची धमाल

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात रम्य सायंकाळी विद्युत रोषणाई, आतिषबाजी, डीजे याचबरोबर महिलांनी केलेला झुम्बा डान्स, लेझीम पथक, विविध ग्रुपच्या मुलींनी केलेले ग्रुप डान्स, स्वागत गीत, हे सर्व भारावून टाकणारे होते. महिलांनी महिलांसाठी घेतलेला हा कार्यक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेत होता भव्य उपस्थिती आणि सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसादाने ही स्पर्धा मोठी संस्मरणीय ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!