एमपीएससी परीक्षेत महसूल सहायकपदी निवड; भुषण शेख यांचा भव्य सत्कार सोहळा

संगमनेर / प्रतिनिधी

कौठे कमळेश्वर (ता. संगमनेर) येथील भुषण सुमैया फैयाज शेख यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत महसूल सहायक पदावर निवड मिळविल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गावात भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

हा सत्कार सोहळा शनिवार दिनांक ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता कौठे कमळेश्वर येथे आयोजित करण्यात आला असून, महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजितदादा तांबे तसेच डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या भुषण शेख यांच्या यशामुळे कौठे कमळेश्वर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, युवक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून फैयाज नुरमहमंद शेख, नासिर नुरमहमंद शेख, रफिक नुरमहमंद शेख, वसिम नुरमहमंद शेख तसेच अबरार नुरमहमंद शेख हे कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!