सुरत-नाशिक-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा आज तळेगाव दिघे येथे
संगमनेर (प्रतिनिधी) :
सुरत-नाशिक-चेन्नई ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण मेळावा गुरुवार दि. २८ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता तळेगाव दिघे येथील सोसायटी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास परिसरातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या मेळाव्यास बुलढाणा येथील प्रसिद्ध विधी सल्लागार मा. अमित पाटील उपस्थित राहणार असून, त्यांनी समृद्धी महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या मोबदल्याच्या तिप्पट रक्कम मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांकडून कोणतीही फी आकारली जाणार नसून गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यांची भूमिका असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
मेळाव्यास उपस्थित राहताना शेतकऱ्यांनी आपल्याकडे आलेल्या नोटिसा सोबत आणाव्यात. तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्याप नोटीस मिळालेली नाही, मात्र त्यांची जमीन बाधित होत आहे, अशा शेतकऱ्यांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोणत्याही शेतकऱ्यांनी तहसील किंवा प्रांत कार्यालयात लेखी स्वरूपात हमीपत्र देऊ नये, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे. सिन्नर, राहुरी, राहाता आणि संगमनेर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहून आपल्या हक्कासाठी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
