राज्य सरकारच्या “लाडकी बहीण” योजनेअंतर्गत महिलांना ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये दिवाळीपूर्वी मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र सण संपल्यानंतरही महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनेक लाभार्थिनींमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता थेट नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लाभार्थिनींच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
![]()
सध्या या योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू असून, अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे काही महिलांच्या अर्जांमध्ये विलंब होत आहे. प्रशासनाकडून लवकरच सर्व अडचणी दूर करून पैसे वितरित करण्याची तयारी सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे.

