प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिरुद्ध वनकर साहेबांचा अहिल्यानगर जिल्हा दौरा उत्साहात संपन्न, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभागाचे कर्तव्यदक्ष प्रदेशाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीचे ख्यातनाम गायक माननीय डॉ.अनिरुद्धजी वनकर साहेब अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आले असता संगमनेर येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी अनुसूचित जाती विभागाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांच्या नेतृत्वाखाली पॅंथर माणिकराव यादव,माजी,जि.कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, संगमनेर शहर काँग्रेस अध्यक्ष सोनू गायकवाड, जिल्हा सरचिटणीस रामनाथ गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत थोरात, तालुका कार्याध्यक्ष दगडू साळवे, राहुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय संसारे, दत्ता अवचिते सर, श्रवण गायकवाड, नितीनजी आल्हाट, संकेत आल्हाट यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दौऱ्यादरम्यान डॉ.वनकर साहेबांनी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी, अनुसूचित जाती विभागाच्या संघटनात्मक बांधणीचा सविस्तर आढावा घेतला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटन मजबुतीकरण याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

तसेच राखीव असलेल्या शिर्डी अनुसूचित जाती लोकसभा मतदारसंघाबद्दल त्यांनी सविस्तर माहिती घेतली. मतदारसंघातील सामाजिक, राजकीय परिस्थिती, बूथ रचना आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

याप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. वनकर साहेब म्हणाले की, काँग्रेस पक्ष हाच खऱ्या अर्थाने संविधान आणि आरक्षणाचा रक्षक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अनुसूचित जाती विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. सर्वांनी एकजुटीने काम करून पक्ष बळकट करावा.

या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!