महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी प्रा विजय कापसे तर सचिव पदी विनोद जवरे

कोपरगाव । प्रतिनिधी ।

पत्रकारांच्या हक्कांसाठी, प्रश्नांसाठी आणि अडचणींच्या काळात सदैव खंबीरपणे पाठीशी उभी राहणारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेची कोपरगाव तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संघटनेचे राज्य अध्यक्ष निलेश सोमानी, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल कोळसे व जिल्हा निवड समिती अध्यक्ष सोमनाथ काळे, जिल्हा सरचिटणीस जनार्दन जगताप यांच्या आदेशाने कोपरगाव तालुका व शहर कार्यकारीनी जाहीर करण्यात आली.

या कार्यकारिणी मध्ये कोपरगाव तालूका अध्यक्ष पदी प्रा विजय कापसे तर सचिव पदी विनोद जवरे यांची निवड करण्यात आली तर ज्येष्ठ पत्रकार व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी तालुका उपाध्यक्षपदी निवृत्ती शिंदे, तालुका कार्याध्यक्षपदी किसन पवार, शहराध्यक्षपदी हाफिज शेख, शहर उपाध्यक्षपदी रवी वाघडकर, शहर कार्याध्यक्षपदी स्वप्निल कोपरे, तालुका संघटकपदी सोमनाथ डफळ, शहर संघटकपदी संजय लाड, तालुका खजिनदारपदी अमोल गायकवाड, तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी विशाल लोंढे, सल्लागारपदी काका खर्डे व दिनेश जोशी, संपर्कप्रमुखपदी राजेंद्र तासकर यांची निवड करण्यात आली. तसेच ज्येष्ठ सदस्य म्हणून फकीरराव टेके, सतीश जाधव, मिलिंद विघे, प्रमोद पवार यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस जनार्दन जगताप नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देताना सांगितले की, “महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना ही केवळ पत्रकारांच्या प्रश्नांपुरती मर्यादित न राहता सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही सातत्याने कार्य करणारी संघटना आहे. पत्रकारांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना नेहमीच पुढाकार घेणारी एकमेव संघटना असल्याचे सांगितले तर तालुकाध्यक्ष विजय कापसे यांनी,“वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि सर्व पत्रकार बांधवांची साथ घेऊन आगामी काळात संघटनेचे कार्य अधिक व्यापक करत पत्रकारांच्या अडचणी, प्रश्न व हक्कांसाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व जनजागृतीचे विविध उपक्रम तालुकाभर राबवत संघटनेत प्रत्येक पत्रकाराला सन्मानाचे स्थान देत सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने काम केले जाईल असे विश्वास देत सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!