सीमेवरील जवानांसाठी विद्यार्थिनींकडून ‘स्नेहबंधाची राखी’

के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

कोपरगाव । प्रतिनिधी ।

रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून जवळके येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सामाजिक जाणीव जपत एक अत्यंत प्रेरणादायी आणि आगळावेगळा उपक्रम राबवला. ऊन, वारा, पाऊस आणि प्रत्येक कठीण प्रसंगाला न घाबरता अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या वीर भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विद्यार्थिनींनी राख्या आणि शुभेच्छा संदेश सीमेवरील जवानांना पाठवल्या आहेत.

“आम्ही आपल्या घरात आणि समाजात सुरक्षित सण साजरा करू शकतो, कारण सीमेवर आमचे वीर जवान डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत,” ही भावना व्यक्त करत विद्यार्थिनींनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डी.आर.सोनवणे सर यांचा विशेष सहकार्याने या राख्या व शुभेच्छापत्र सुरक्षितपणे सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत रवाना करण्यात आले. विद्यार्थिनींच्या या देशभक्तीपर आणि संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डी.आर.सोनवणे सर ,पत्रकार विनोद जवरे,वाघ सर, राहाणे सर ,साबळे सर,गोरडे सर,चिने सर, गाडेकर सर,खंडिझोड सर ,घारे सर,पोळके मँडम,दिघे मँडम,औताडे मँडम शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!