पंढरपूर भक्तनिवासासाठी निधी मागणी — संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिडी ट्रस्टच्या सदस्यांची आमदार अमोल खताळ यांच्याकडे भेट

संगमनेर (प्रतिनिधी) — पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्या भक्त निवासाच्या कामासाठी आवश्यक निधी मिळावा, या मागणीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिडी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेतली.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी ट्रस्टचे अध्यक्ष बी.व्हि.दिघे व अमोल दिघे यांना दिली आमदार अमोल खताळाकडून मदतीचे आश्वासन

पंढरपूर हे संपूर्ण महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. वाढत्या भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्टतर्फे नव्या भक्तनिवासाचे काम सुरू आहे. मात्र, या बांधकामासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याने ट्रस्ट सदस्यांनी आज आमदार अमोल खताळ यांच्याकडे निधी सहाय्याची विनंती केली.

आमदार अमोल खताळ यांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करत, “संत परंपरेशी निगडित कामाला माझा नेहमीच पाठिंबा असेल” असे सांगत निधी देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला.

भक्तनिवास उभारणीमुळे पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना मोठी सुविधा मिळणार असून या उपक्रमामुळे संगमनेर तालुक्याशी असलेली संत परंपरेची नाळ अधिक दृढ होईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

📍 संतांच्या कार्याला विधायक पाठबळ — आमदार खताळ यांची ग्वाही

याप्रसंगी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडी ट्रस्टचे अध्यक्ष बी व्ही दिघे, ज्ञानदेव कार्ले ,तुकाराम दिघे, नामदेव दिघे, मधुकर दिघे, अमोल दिघे, रवीद्र दिघे दत्तात्रय दिघे ,सोपान दिघे ,शशिकांत जगताप, निलेश दिघे तसेच तळेगाव परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!