तळेगाव गणात निवडणुकीचा माहोल तापला!


युवक शिवराज मुंगसे चर्चेत – निस्वार्थ उमेदवारासाठी जनतेत उमेद

संगमनेर (प्रतिनिधी):
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, जिल्हाभरात राजकीय वातावरण तापले आहे. कार्यकर्त्यांपासून इच्छुकांपर्यंत सर्वांच्या आशा आता फुलू लागल्या आहेत.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव जिल्हा परिषद गटातही निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. “आपणच उमेदवार” असा दावा करत अनेकांनी मोर्चेबांधणीस प्रारंभ केला असून, प्रचारयंत्रणा गुपचूप सुरू झाल्याचे दिसत आहे.

तळेगाव गण सर्वसाधारण झाल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक तरुण नेत्यांनी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.

 

याच पार्श्वभूमीवर देवकौठे येथील युवा उद्योजक शिवराज मुंगसे यांचे नाव सध्या तळेगाव गणात सर्वाधिक चर्चेत आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाची आवड असलेल्या या तरुणाने गावोगावी समाजकारणातून चांगली छाप निर्माण केली आहे.

युवक वर्गाकडून शिवराज मुंगसे यांना मोठा पाठिंबा मिळत असून, निस्वार्थ आणि प्रामाणिक उमेदवाराची मागणी मतदारांमध्ये जोर धरत आहे. ठेकेदार प्रवृत्तीच्या उमेदवारांविरोधात विरोधाचे वातावरण दिसत असून, या वेळेस मतदार स्वच्छ आणि सेवाभावी नेतृत्वाच्या शोधात असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

तळेगाव गणातील ही निवडणूक नवी दिशा दाखवेल का?
जनतेचा कल निस्वार्थ नेतृत्वाकडे झुकतोय का?
हे चित्र आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!