लोहारे मिरपुर आठवडे बाजारास आमदार अमोल खताळ यांची भेट
संगमनेर प्रतिनिधी:संगमनेर तालुक्यातील लोहारे मिरपूर गावात नुकताच सुरू झालेल्या आठवडे बाजारास आमदार अमोल खताळ यांनी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या आडी अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
लोहारे मिरपूर ग्रामपंचायतीच्या वतीने दर रविवारी आठवडे बाजार भरविण्यात येत आहे. या बाजारात परिसरातील शेतकरी आपला शेतमाल थेट विक्रीसाठी आणत असून, गावातच माल विकण्याची सुविधा मिळाल्याने शेतकरी समाधानी असून शेतकर्यांचा आत्मविश्वास अन मेहनतीची जिद्द पाहून अभिमान वाटतो.” त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कृषी योजनांची माहिती दिली.स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आमदार खताळ यांच्या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले यावेळी त्यांच्या समवेत गणपत मुर्तडक मोहन मुर्तडक प्रियंका मुर्तडक राजेंद्र रणमाळे दत्तू रणमाळे शरद मुर्तडक ज्ञानेश्वर मुर्तडक वैभव मुर्तडक कुंदन फिटर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
