डॉ. गोडगे हॉस्पिटलतर्फे तळेगाव दिघेत मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न


संगमनेर (प्रतिनिधी) —
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे डॉ. गोडगे हॉस्पिटल, तळेगाव दिघे यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. तळेगाव परिसराचे भूषण व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकुमार गोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. मेड हॉस्पिटल, राहता यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पार पडले.
या शिबिरात नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोफत औषधोपचार तसेच सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिराचा लाभ शंभरहून अधिक रुग्णांनी घेतला असून, ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिर यशस्वीतेसाठी डॉ. अभिजीत जगताप, भाऊसाहेब खालकर, अच्युत सोनवणे, सुनील गोरडे, सौरभ ठोंबरे, वनिता जगताप, नितीन दिघे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थितांच्या साक्षीने लोहारे गावचे उपसरपंच ह.भ.प. राहुल महाराज पोकळे व सुनिल दिघे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला चालना मिळाल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

यावेळी डाॅ.नंदकुमार बोलताने म्हणाले की
“ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळावी, हाच या नेत्र तपासणी शिबिरामागील मुख्य उद्देश आहे. डोळ्यांचे आजार वेळेत निदान झाले तर अंधत्व टाळता येते. त्यामुळे अशा शिबिरांमधून आरोग्याविषयी जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यातही तळेगाव दिघे व परिसरातील नागरिकांसाठी असे आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्याचा आमचा मानस आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!