रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
जिल्हा सचिवपदी दादासाहेब यादव


संगमनेर तालुकाध्यक्षपदी साहेबराव यादव


संगमनेर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)ची जिल्हा कार्यकारिणी बैठक नुकतीच राहुरी येथे जिल्हाध्यक्ष सुधाकरराव रोहम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत संघटनात्मक फेरबदल करत संगमनेर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते दादासाहेब यादव यांची जिल्हा सचिवपदी, तर साहेबराव यादव यांची संगमनेर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
दादासाहेब यादव व साहेबराव यादव हे दोघेही अनेक वर्षांपासून आंबेडकरी विचारांच्या चळवळीत सक्रिय असून संघटन बांधणीसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या निवडीमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट)च्या संघटनात्मक बळकटीस चालना मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहम यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दादासाहेब यादव व साहेबराव यादव यांच्या निवडीबद्दल

लोकनेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात, पँथर नेते माणिकराव यादव, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बंटी यादव यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!