जोर्वे गावच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही-डॉ.सुजय विखे
जोर्वे जिल्हा परिषद गटातील सर्वच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संगमनेर तालुका प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावातील ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विखे पाटील परिवार तसेच सरपंच प्रिती गोकुळ दिघे यांच्यावर जे प्रेम दाखवलं ते प्रेम आम्ही कधी विसरणार नाही आणि या जोर्वे गावाच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही, ही माझी जबाबदारी आहे, असा विश्वास माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील,जोर्वे येथील श्रीदत्तमंदिर प्रांगणात भाजप आश्वी मंडलाध्यक्ष गोकुळ दिघे व सरपंच प्रिती दिघे यांच्या संकल्पनेतून “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डॉ विखे बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, कोल्हेवाडीच्या सरपंच सुवर्णा दिघे , रहिमपूरच्या सरपंच सविता शिंदे , कनकापूरच्या सरपंच ज्योती पचपिंड मालुंजे सरपंच सुवर्णा घुगे आधी महिला मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोर्वे गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे. या मतदारसंघातील प्रत्येक गावातील महिला सुरक्षित राहाव्यात यासाठी गावच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा युवकांनी पुढाकार घेतला असून या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा देण्यात येईल.मी स्वतः या कामात लक्ष घातले आहे “तुम्ही जागा द्या स्मारक मी उभारतो” हा माझा जोर्वे ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण त्वास जात आहे याचा मला मनस्वी आनंद आहे.पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटील परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन करत, “आमची संपूर्ण ताकद तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लावणार आहोत,” असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भाजपचे आश्वी मंडलाध्यक्ष गोकुळ दिघे यांनी केले तर आभार भाजप महिला मोर्चा अध्यक्षा सौ .मनिषा वर्पे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जोर्वे जिल्हा परिषद गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत प्रथम क्रमांक स्कुटी दुचाकी गाडीच्या मानकरी ठरल्या आहेत उंबरी बाळापूरच्या सोनाली सारबंदे
द्वितीय क्रमांकाच्या फ्रिजच्या मान करी ठरल्या आहे उंबरी बाळापूरच्या पुष्पा खेमनार तृतीय क्रमांक एलईडी च्या मानकरी ठरल्या आहेत क्रमांक तीनच्या मानकरी ठरल्या आहेत रहिमपूरच्या सोनाली शिंदे चतुर्थ क्रमांक गिरणीच्या मानकरी ठरले आहे जोर्वेच्या सुनिता मोरे पंचम क्रमांक शिलाई मशीनच्या मानकरी ठरल्या आहे जोर्वेच्या मनीषा इंगळे सहावा क्रमांक सायकलच्या मानकरी ठरलेल्या आहे उंबरी बाळापूरच्या मीनाक्षी भुसाळ तसेच मिक्सर, पाणी जार आणि पैठणी अशी विविध आकर्षक बक्षिसे जिंकण्याचा व खेळाचा मनमुराद आनंद सर्व महिला भगिनींनी घेतला आहे

