युवा नेते शशिकांत जगताप यांना पितृशोक

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील आंबेडकरी चळवळीतील युवा नेते शशिकांत जगताप यांचे वडील बाळासाहेब दामु जगताप यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे तळेगाव दिघे परिसरात शोककळा पसरली आहे.


बाळासाहेब जगताप हे मनमिळावू, शांत व सर्वांना आपुलकीने वागवणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. सामाजिक जाणीव असलेले व गावातील विविध उपक्रमांत ते सक्रिय सहभाग घेत असत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने जगताप कुटुंबियांसह मित्रपरिवार व समाजबांधवांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!