तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती कामाला अखेर मुहूर्त

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती कामाला अखेर सुरुवात झाली आहे. कोल्हेवाडी आणि निंबाळे परिसरात या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून, यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्याचे महसूल व दुग्धव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्णजी विखे पाटील, लाडके माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील आणि संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली हे काम मार्गी लागले आहे.
​ कोल्हेवाडी गावचे युवा नेते श्री. राहुलजी दिघे यांच्या विशेष सहकार्यातून आणि पाठपुराव्यातून हे काम सुरू करण्यात आले आहे.
आज प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी वडगावपान-तळेगाव गटाचे युवा नेते श्री. शिवाजी बाबा आहेर (बाबा पॅटर्न) यांनी परिसरातील शेतकऱ्यांसह भेट देऊन कामाची पाहणी केली.


​तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम तांत्रिक अडचणींमुळे रखडल्याने परिसरात पाणीप्रश्न गंभीर झाला होता. मात्र, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांनी या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालून प्रशासकीय अडथळे दूर केले.
​आज कोल्हेवाडी आणि निंबाळे परिसरात दुरुस्तीचे काम वेगाने सुरू झाले असून, यावेळी ‘बाबा पॅटर्न’ म्हणून ओळखले जाणारे युवा नेते शिवाजी बाबा आहेर यांनी कामाच्या गुणवत्तेची पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत, रखडलेले काम सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.


​तळेगाव-वडगाव पान परिसरातील नागरिकांच्या वतीने ना. डॉ. राधाकृष्णजी विखे पाटील, डॉ. सुजयदादा विखे पाटील, आ. अमोलभाऊ खताळ पाटील आणि युवा नेते राहुलजी दिघे पाटील यांचे जाहीर आभार मानण्यात येत आहेत.
​”जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सुटल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. हे काम वेळेत पूर्ण होऊन नागरिकांची तहान भागेल असा विश्वास व्यक्त होत आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!