महायुती पदाधिकाऱ्यांनी अश्वारूढ पुतळ्याचे केले पूजन व महाआरती
संगमनेर बसस्थानकात महायुतीने उभारला अश्वारूढ पुतळा
संगमनेर : छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवसेना-महायुतीच्या वतीने आमदार अमोल खताळ यांच्या संकल्पनेतून संगमनेर बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सायंकाळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ, बंधू राहुल खताळ तसेच मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख शिवसेनेचे शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे यांच्यासह महायुती आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी हस्ते मंत्रोच्चारात शिवपूजन करून महाआरती करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. “शहरात अश्वारूढच पुतळा उभारला जाईल” असे फलकही सर्वत्र झळकले आहे. बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ हा पुतळा उभारल्या मुळे येणाऱ्या-जाणाऱ्या शिवभक्तांचे तो खास आकर्षण ठरला आहे.लहान मुलांपासून ते तरुण-तरुणी, महिला-पुरुष अशा सर्वच नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर फोटो काढत आपल्या मोबाईलमध्ये त्या क्षणांची छबी कैद केली. त्यामुळे संपूर्ण संगमनेरकरांसाठी हा पुतळा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला
