दत्तधाम सरकार उर्फ ‘गडगेबाबा’ प्रकरण; भोंदुगिरी, बनावट व्हिडिओ व बदनामीप्रकरणी तक्रार दाखल

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील वडगाव पान व मनोली शिवाराच्या सीमेवरील दत्तधाम सरकार उर्फ ‘गडगेबाबा’ यांच्या आश्रमात भोंदुगिरी केल्याच्या आरोपांबाबत विविध स्तरांवर तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीकडून कॅन्सरसारखे आजार बरे करणे, अपत्यहीन महिलांना अपत्यप्राप्ती करून देणे तसेच विविध दुर्धर आजारांवर ‘दैवी शक्ती’ व ‘मंत्रसामर्थ्य’ यांद्वारे उपचार केल्याचे दावे केल्याची तक्रार आहे. तसेच ‘दत्तधाम सरकार’ या नावाने सुरू असलेल्या यूट्यूब चॅनेलद्वारे अशा प्रकारच्या दाव्यांची जाहिरात केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात ३० मार्च २०२६ रोजी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर १३ एप्रिल रोजी पंचायत समिती संगमनेर येथील आरोग्य अधिकाऱ्यांकडे संबंधितांकडून दिल्या जाणाऱ्या औषधसाठा, परवाने आदींची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत अर्ज करण्यात आला. तसेच १६ एप्रिल रोजी विभागीय पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडेही निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान, तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार १२ एप्रिल रोजी काही व्यक्तींमार्फत संपर्क साधून प्रकरण मिटविण्यासाठी बैठक घेण्याबाबत वारंवार फोन करण्यात आले. त्याच दिवशी सायंकाळी काही व्यक्ती घरासमोर येऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याचबरोबर, संबंधितांकडून काही अनुयायांच्या मदतीने बनावट व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व एका विधिज्ञ व्यक्तीविरुद्ध खंडणी मागितल्याचे आरोप करण्यात आले असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने छायाचित्रांचा गैरवापर केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी अ‍ॅड. रंजना पगार गवांदे यांनी संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, संबंधित व्हिडिओंची प्रत पेन ड्राईव्हद्वारे पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या प्रकाराचा निषेध व्यक्त करण्यात आला असून, संबंधित व्हिडिओंमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींचा समितीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अप्रमाणित व बदनामीकारक मजकूर किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!