पालकमंत्र्यांवरील आरोपांवर महायुतीचा जाहीर निषेध

संगमनेर (प्रतिनिधी) – अमृतवाहिनी शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी व करुले गावचे सरपंच बाळासाहेब आहेर यांनी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात केलेल्या आरोपांवर संगमनेर तालुका महायुती, विखे पाटील समर्थक, आमदार अमोल खताळ पाटील समर्थक व जनसेवा मंडळाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित आरोप हे राजकीय द्वेषातून प्रेरित असून त्यामागे पालकमंत्र्यांची बदनामी करण्याचा हेतू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. करुले गाव हे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात नसताना देखील अनधिकृतरीत्या पाणी उपसा व वीज वापर केल्याचा प्रकार अधिकाऱ्यांनी उघड केल्यानंतर कारवाईच्या भीतीने असे आरोप करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर महायुती पदाधिकारी व समर्थकांनी अशा “विकृत प्रवृत्तीचा” जाहीर निषेध करत संबंधितांनी त्वरित बदनामीकारक वक्तव्ये थांबवावीत, अशी मागणी शिवाजी बाबा आहेर यांनी केली आहे. अन्यथा मोठ्या जनआंदोलनाचा इशारा देत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

यावेळी भाऊसाहेब आहेर (उपसरपंच, निळवंडे), शिवाजी बाबा आहेर तसेच जनसेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधितांनी जाहीर माफी मागून पालकमंत्र्यांची बदनामी थांबवावी, अशी मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!