छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत समाधान शिबीर आज तळेगावात
संगमनेर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान” अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी तळेगाव येथील महाराजा लॉन्स येथे करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या शिबिरात नागरिकांना विविध महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शिबिरात प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनासंबंधी प्रकरणे, अकृषिक (एन.ए.) परवानगी, ७/१२ मधील त्रुटी दुरुस्ती, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, डिजीटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उतारे वाटप आदी सेवा दिल्या जाणार आहेत.
तसेच अॅग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजुरी, सनद प्रक्रियेबाबत माहिती व मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

महसूल विभागाकडून गाव दप्तर अद्ययावत करण्यासाठी पत्रके तयार करण्यात येणार असून नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय, संगमनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

याप्रसंगी बोलताना जनसेवा फाउंडेशन निळवंडेचे शिवाजी आहेर म्हणाले की, शासनाच्या महसूल समाधान शिबिरामुळे नागरिकांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे मार्गी लागत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. प्रशासनाने लोकाभिमुख भूमिका घेत विविध महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचत आहे. शिबिर यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

बाबा पॅटर्न व आमदार अमोल भाऊ खताळ व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने कार्यक्रम यशस्वी पार पडला
