आपल्याच नेत्यांना बदनाम करण्याचा काहींचा प्रयत्न – विठ्ठल घोरपडे
“संशयाचे वातावरण निर्माण करणारे कोण आहेत, हे जनतेला माहिती”
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या पाणी व वीज टंचाई आढावा बैठकीत गावागावातून आलेल्या महायुती पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्याने बैठक दुपारी १.३० वाजेपर्यंत सुरू होती. बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. असे असताना काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक पालकमंत्री व आमदारांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने “महायुती कार्यकर्त्यांची बैठकच झाली नाही” अशी चुकीची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचविल्याची खंत शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे यांनी व्यक्त केली.
घोरपडे म्हणाले की, “स्वतःच्या नेत्यांविषयी संवेदनशीलता न दाखवता बदनामीचे राजकारण करणारे आणि संशयाचे वातावरण निर्माण करणारे कोण आहेत, हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. अशा प्रवृत्तींना योग्य वेळी सडेतोड उत्तर दिले जाईल.”
टंचाई आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना पुरेसा वेळ देऊन त्यांच्या अडचणी ऐकून घेण्यात आल्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे बैठक झालीच नाही किंवा कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही, असा दावा वस्तुस्थितीला धरून नसून तो केवळ राजकीय हेतूने करण्यात आलेला अपप्रचार असल्याची टीकाही त्यांनी केली.
महायुती सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हे जनतेच्या प्रश्नांबाबत अत्यंत संवेदनशील असून पाणीटंचाईसारख्या गंभीर विषयावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही घोरपडे यांनी स्पष्ट केले. काही जण स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असले तरी जनता सर्व काही ओळखून असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी के

