तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला पाणी सुटले.
मंत्री विखे पाटील आणि आ.खताळ यांच्यामुळे तळेगावसह २१ गावांना मोठा दिलासा
संगमनेर दि.२० प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील तळेगावसह २१ गावांसाठी जीवनदायिनी ठरणारी तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अखेर कार्यान्वित झाली. जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाणी येण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या दिलेल्या सूचना आणि आमदार.अमोल यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या योजनेला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.
या योनेबाबत ठेकेदारांनी लाभ क्षेत्रातील शेतकर्याची दिशाभूलकरून जाणीवपुर्वक राजकारण सुरू करून काम बंद ठेवले होते.पाणीपुरवठा योजने मध्ये असणाऱ्या तांत्रिक अडचणी, ठेकेदाराचा मनमानी कारभार तसेच पूर्वीच्या कामकाजात अनियमितता यांमुळे अनेक वर्षे ही पाणीपुरवठा योजना बंद पडलेली होती.परिणामी तळेगावसह २१ गावांतील नागरिक, विशेषतः महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत होती. योजनेच्या पाइपलाईन च्या कामात निर्माण झालेल्या सर्व अडथळ्यांवर मात करून अखेर प्रवरा नदीचे पाणी वडगाव पान येथील साठवण तलावात सोडण्यात आले. आमदार अमोल खताळ यांनी महायुती कार्यकर्त्यांसमवेत वडगाव पान येथील साठवण तलावावरती जाऊन पाहणी करत जलपूजन केले या योजनेच्या पंप हाऊस मधील मोटारीचे बटन दाबून वडगाव पान तसेच तीगाव माथ्यावरील टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात आले.

या भागातील नागरीकांची पाण्याची अडचण दूर व्हावी म्हणून मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हेवाडी येथील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्रा.डॉ सुजय विखे पाटील यांचेही या कामासाठी मोठे सहकार्य मिळाले.परंतू पाणी मिळू द्यायचे नाही म्हणून पाईपलाईनच्या कामातही अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला.मात्र राज्यातील महायुती सरकार पाणी देणारे सरकार असल्यामुळे योजनेला पाणी देण्याचा शब्द आम्ही पूर्ण केला असल्याचे आ.खताळ म्हणाले.
काही लोकांनी वीज बिल रखडल्याचे कारण पुढे करून ही योजना अनेक वर्षे बंद ठेवली. या परिस्थितीस जबाबदार कोण, याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. अशी टीका करत या योजनेचे थकीत वीज बिल शासना कडून माफ करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून यासाठी विधानसभेत आवाज उठवला आहे.हा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
कथित भ्रष्टाचाराची चौकशी होणार
तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत मागील काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी केली जाणार आहे तसेच या योजनेसाठी कार्यरत असलेली जुनी समिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वीच बरखास्त केली असून लवकरच नव्या समितीची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार अमोल खताळ यांनी सांगितले
दिशाभूल थांबवावी -आ खताळ
“गेल्या चाळीस वर्षांत सत्तेत राहूनही जनतेला नियमित पाणी देता आले नाही, हे मोठे अपयश आहे. आता टेस्टिंगच्या नावाखाली अधिकाऱ्यांशी संगनमत करून आपल्या कार्यकर्त्यांकडून पाणीपूजन करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. योजना बंद पडली होती, तेव्हा त्यांनी कोणते प्रयत्न केले होते?” असा सवाल उपस्थित करत आमदार खताळ यांनी राज्यातील महायुती सरकार जनतेला कायम स्वरूपी आणि शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहे

