काकडवाडी पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा । घोलप

संगमनेर (प्रतिनिधी) : संगमनेर तालुक्यातील काकडवाडी हद्दीतील पालखी मार्गाचे डांबरीकरण होऊन अनेक दिवस उलटले असले तरी रस्त्याच्या साईडपट्ट्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. तसेच दिशादर्शक फलक व किलोमीटर दर्शविणारे बोर्डही बसविण्यात आलेले नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.


सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी ग्रामस्थांसह मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभागाकडे उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयातील कार्यकारी अधिकारी राहुल गायकवाड यांनाही माहिती देण्यात आली आहे.


श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे जाणारी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पुढील महिन्यात काकडवाडी मार्गे जाणार असल्याने पालखी आगमनापूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

पत्रकार दत्तात्रय घोलप हे संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष तसेच रयत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!