पारेगाव बुद्रुक पालखी मार्ग दुरुस्ती कामास सुरुवात

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची तात्काळ कार्यवाही

संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील रस्ता व पालखी मार्गाच्या दुरुस्तीच्या कामास आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती महायुतीचे पदाधिकारी सुरेश दळवी आणि किशोर गडाख यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे सिन्नर तालुक्यातून संगमनेर तालुक्यात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पारेगाव बुद्रुक, काकडवाडी परिसरातील पालखी मार्ग मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाला होता. पालखी सोहळ्यादरम्यान या मार्गावर वारकरी भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांसह वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी महायुतीचे सुरेश दळवी आणि किशोर गडाख यांनी आमदार खताळ यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कार्यवाही करत पालखी मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आमदार अमोल खताळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!