प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणाच्या शोधासाठी थोरात कारखान्याच्या यंत्रणेची मदत

संगमनेर ( प्रतिनिधी)–प्रवरा नदी दुधडी भरून वाहत असून दुपारी प्रवारा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पारेगाव गडाख येथील ऋषिकेश नवनाथ गडाख हा पुराच्या पाण्यात बेपत्ता झाला असून ही बातमी कळताच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी कारखान्यासह आपल्या सर्व यंत्रणेला मदतीच्या तात्काळ सूचना दिल्या. यानंतर सौ दुर्गाताई तांबे व डॉ जयश्रीताई थोरात यांनी घटनास्थळाला त्वरित भेट देऊन बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी अधिक सतर्कतेने काम करण्याच्या सूचना दिल्या

गंगामाई घाटावर दुपारी ऋषिकेश गडाख व इतर त्याचे मित्र पोहण्यासाठी गेले यानंतर ऋषिकेश पाण्यामध्ये खोलवर गेल्यानंतर तो बाहेर येईना तो पानात बुडाला की काय ही शंका निर्माण झाली. घटनास्थळावर सर्वत्र धावाधाव झाली ही बातमी महाराष्ट्राची वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना कळताच त्यांनी तातडीने थोरात कारखान्याची यंत्रणा व सौ दुर्गाताई तांबे आणि डॉ जयश्रीताई थोरात यांना घटनास्थळाला भेट देण्याच्या सूचना दिल्या.

यानुसार सौ दुर्गाताई तांबे व डॉ जयश्रीताई थोरात , नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे या गंगामाई घाटावर पोहोचल्या. थोरात कारखान्याची व नगरपालिकेची यंत्रणा तातडीने मदतीसाठी धावली. आणि कार्यकर्त्यांनी स्वयंस्पृतिने शोध मोहिमेत सहभाग घेतला यामध्ये कारखान्याचे इंजिनिअर किशोर देशमुख, महेश म्हशे ,मुन्ना यादव, आनंदा पवार ,रंजीत उघडे, सागर कातोरे ,सरोज यादव, कनोज यादव ,मनोज यादव यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी नदीमध्ये शोध मोहिमेत सहभाग घेतला.


नगरपालिकेचे सुरक्षा जवानही तातडीने सर्व मदत करत होते यावेळी नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे, नगरसेवक नितीन अभंग, यांच्यासह लाला पठाण, नूर मोहम्मद शेख , निखिल पापडेजा वैष्णव मुर्तडक,यांच्यासह विविध नगरसेवक दाखल झाले सर्वांनी युवकाच्या शोध मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.


प्रशासन सहकार आणि युवक कार्यकर्ते यांच्या मदतीने ऋषिकेश नवनाथ गडाख यांचा अध्यापही शोध सुरू आहे. या घटनेने संपूर्ण शहरामध्ये हळहळ सुरू झाली असून नागरिकांनी अधिक सतर्क रहावे. नदीकाठी जाऊन स्टंटबाजी करू नका जीवाची काळजी घ्या असे आवाहन सौ दुर्गाताई तांबे यांनी केले असून प्रशासनाने व नागरिकांनी युवकांना अधिक समज देत काळजी घेण्याचे आव्हान डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले आहे

याचबरोबर ऋषिकेश गडाख यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना सौ दुर्गाताई तांबे व डॉ जयश्रीताई थोरात यांनी यावेळी गावातील ग्रामस्थ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!