अकोले विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचा भाजपा परिवारात प्रवेश
अकोले विधानसभा मतदारसंघातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती सुनिता अशोकराव भांगरे आणि शेंडी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. दिलीपराव भांगरे यांच्यासह तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत पक्षप्रवेश केला.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात नव्या कार्यकर्त्यांचे भाजपा परिवारात स्वागत करण्यात आले. या प्रवेशामुळे अकोले तालुक्यात पक्षसंघटना अधिक मजबूत होणार असून, स्थानिक पातळीवरील विकासकामांना नवे बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी आमदार श्री. वैभव पिचड, ज्येष्ठ नेते श्री. सिताराम भांगरे, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
