फलटण महिला डॉक्टर प्रकरणी धनंजय मुंडेंची मागणी — “SIT चौकशी करा, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी”

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे आणि एका पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या अत्याचारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप आहे.

या पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी गंभीर विधान केले आहे. ते म्हणाले,

“सदरची महिला डॉक्टर ही बीडची आणि मुंडे समाजातील असल्याने जर तिच्या तक्रारीकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केले असेल, तर ते अत्यंत गंभीर प्रकरण आहे. या संपूर्ण घटनेची स्वतंत्र SIT मार्फत चौकशी व्हावी आणि प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्यात यावी.”

मुंडे यांनी यावेळी प्रशासन आणि शासनाला आवाहन केले की, अशा संवेदनशील प्रकरणात कोणावरही दबाव आणला जाऊ नये, तसेच पीडितेला न्याय मिळावा यासाठी तातडीने कारवाई करावी.

या प्रकरणामुळे आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून, राज्यभरातून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!